मंडणगड : वाल्मिकीनगर रोडवर मद्यधुंद अवस्थेतील तिघांवर गुन्हा

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील मौजे वाल्मिकनगर ते वेसवी जाणाऱ्या रस्त्यालगत मद्यधुंद अवस्थेतील तीन जणांविरोधात बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार. २८ मार्च रोजी रात्री ८.३० ते ९.३० वा. कालावधीत करण्यात आली आहे.

चंद्रकांत रामा जगताप (४०, रा. मुळ रा. महाड, रायगड सध्या रा. बाणकोट मंडणगड), रोहित बाबूराव गौतम (३१, मूळ रा. मुंबई सध्या रा. बाणकोट, मंडणगड), मोहन रामसरन यादव (४५, मूळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा. बाणकोट, मंडणगड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

हे तिघेही शुक्रवारी रात्री आपल्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारू पिऊन बेधुंद अवस्थेत आढळून आले होते. त्यांच्यविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 31/Mar/2025