नेपाळमध्ये राजेशाहीच्या मागणीसाठी हिंसक निदर्शने झाली. प्रशासनाने काठमांडूमध्ये संचारबंदी लागू केली असून लष्कर तैनात केले आहे. दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली भूकंपग्रस्त बँकॉक येथे सुरू असलेल्या बिमस्टेक परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडला जाणार आहेत.
दरम्यान, आंदोलनादरम्यान एका भारतीय नागरिकासह 9 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, राजेशाहीवाद्यांच्या आंदोलनादरम्यान लुटमार केल्याप्रकरणी एका भारतीय नागरिकासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. रवी रंजन कुमार हे बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहेत. काठमांडूतील एका डिपार्टमेंटल स्टोअरमधून दारू, फळे आणि मेकअपचे साहित्य लुटल्याच्या आरोपाखाली रंजन यांना अटक करण्यात आली आहे, असं वृत्त आहे
पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान ओली यांचा हा पहिलाच थायलंड दौरा आहे. ओली मंगळवारी थायलंडला रवाना होतील.
थायलंडचे पंतप्रधान पाटोंगतरन शिनावात्रा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ओली थायलंडच्या पाच दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. थायलंडमध्ये 1 ते 5 एप्रिल दरम्यान बिम्सटेक (बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन) च्या सहाव्या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू
काठमांडू: काठमांडूच्या बानेश्वर-टिंकुने भागात राजेशाही समर्थक आंदोलनादरम्यान आंदोलकांनी दगडफेक केली, एका राजकीय पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केला, वाहनांना आग लावली आणि दुकाने लुटली.
एकूण 110 जणांना अटक करण्यात आली
दरम्यान, तोडफोडीच्या घटनेचा तपास करण्यासाठी काठमांडू जिल्हा न्यायालयाने राजेशाही समर्थक राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या (आरपीपी) नेत्यांसह 41 जणांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शुक्रवारी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर समितीचे नेते नवराज सुबेदी यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याने गुरूंग समितीचे कार्यवाहक कमांडर म्हणून पदभार स्वीकारतील.
नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा स्थापनेसाठी आंदोलन तीव्र
तीन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे नेपाळ 2008 नंतर पुन्हा एकदा राजेशाही राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात माजी राजा ज्ञानेंद्र यांनी नेपाळच्या जनतेचा पाठिंबा मागितला आणि काही दिवसांतच राजा आणि राजेशाही राष्ट्र परत मिळावे या मागणीसाठी जनता रस्त्यावर उतरली.
माजी राजा ज्ञानेंद्र म्हणाले होते की, देशाचे रक्षण आणि राष्ट्रीय एकता प्रस्थापित करण्याची जबाबदारी आता आमची आहे. तेव्हापासून नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा स्थापन करण्याच्या मागणीसाठी निदर्शने तीव्र झाली आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 31-03-2025
