ऐन उन्हाळ्यात खेड-सवेणी-माणी मार्गालगत वृक्ष लागवड

खेड : तालुक्यातील खेड-सवेणी-माणी मार्गालगत ऐन उन्हाळ्यात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. उन्हाच्या झळा बसत असताना १०० हून अधिक रोपांची लागवड येथे करण्यात आली आहे. ही रोपे जगण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर असणार आहे.

ऐन उन्हाळ्यात वृक्ष लागवड करून निधीचा चुराडा करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या मार्गालगत खोदलेल्या खड्ड्यांमध्ये २० मार्चपासून १००हून अधिक रोपे लावून केवळ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला जात आहे.

एका ट्रकमधून रोपे आणून खोदलेल्या खड्ड्यांमध्ये लावण्यात आली. यातील १०० हून अधिक रोपे सुकलेली होती. याबाबत या मार्गावरून ये-जा करणाऱ्या काही जागरूक नागरिकांनी संबंधित कामगारांकडेदेखील विचारणा केली. ऐन उन्हाळ्यात रोपांची लागवड केल्यानंतर ती जगवण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

खेड तालुक्यातील वेरळपासून सवेणी-माणी मार्गावर रोपांची लागवड करण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अजब कारभाराने मार्गावरून ये-जा करणारे सारेच अवाक होत आहेत. या मार्गावर सुकलेल्या रोपांची लागवड करून खात्याला नेमके काय साध्य करायचे आहे, असा उपहासात्मक प्रश्न वन्यप्रेमी शत्रुघ्न आंब्रे यांनी केली आहे.

सखोल चौकशीची मागणी
खेड-सवेणी-माणी मार्गा लगत चक्क उन्हाळ्यातच सुरू असलेली वृक्ष लागवड ही आश्चर्यकारक बाब म्हणावी लागेल. खड्ड्यांमध्ये सुकलेली रोपे लावण्यात आली आहेत, यामागचे नेमके रहस्य काय? उन्हाळ्यातील वृक्ष लागवड कितपत तरेल ? या वृक्ष लागवडीवर ऐन उन्हाळ्यात निधी खर्च करण्याची गरजच काय? या प्रकाराची सखोल चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी खेड-माणीमधील
उपस्थित करत ऐन उन्हाळ्यात वृक्ष लागवडीवर निधीचा चुराडा करण्याची परवानगी नेमकी दिली कोणी? अशा प्रश्नांचा भडीमारही केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 31/Mar/2025