मंडणगड : समस्याग्रस्त समाज घटकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी शक्य ते सर्व करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण समितीचे सदस्य, राज्यसभेचे खासदार धैर्यशिल पाटील यांनी मंडणगड येथे केले. भारतीय जनता पार्टी तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा अध्यक्ष केदार साठे, उपाध्यक्ष प्रकाश शिगवण, तालुका अध्यक्ष लक्ष्मण मोरे, दळवी एज्युकेशन समूहाचे चेअरमन व पार्टीचे पदवीधर प्रकोष्ठ अजय दळवी, मकरंद म्हादलेकर, श्रीराम इदाते, विश्वदास लोखंडे, स्मिता जावकर, श्वेता महाडिक, वसंत सुतार, प्रवीण कदम, गिरीष जोशी, यश मेहता, महेश कंचावडे, वैभव नारकर, तुषार येरुणकर, अशोक गोविलकर, काजल लोखंडे, विजय दरिपकर, प्रभाकर पेंडसे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टी हा संघर्ष करत विचार धारेतून निर्माण झालेला पक्ष आहे. देश हितास अग्रक्रम देणाऱ्या नेतृत्वाच्या हातात या देशाचे भवितव्य सुरक्षित आहे. त्यामुळे पक्षास उज्ज्वल भविष्य काळ आहे. पक्षाने गेल्या दहा वर्षांत समाजातील शेवटच्या थरातील प्रत्येक समाज घटकास योजना आणली आहे व भ्रष्टाचार मुक्त कारभार व स्वच्छ पारदर्शी प्रशासनाचे माध्यमातून लाभार्थीचे बचत खात्यात थेट लाभ देऊन त्यास लाभान्वित केले आहे. पुर्ण मतदार संघाचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार असून दापोली मतदार संघातील बेरोजगार व पायाभुत सुविधांचे विकासाकरिता मी कटिबद्ध आहे. आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीत असल्याने आमच्या पक्षाचा विस्तार हा अटळ असल्याचे व तो कोणीही थांबवू शकणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 07/Oct/2024














