खेड : तांत्रिक विद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इमारतींसाठी १३ कोटी ४६ लाख मंजूर

खेड : क्रांतिकारी अनंत कान्हेरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकामाचे १३ कोटी ४६ लाख ५० हजार रकमेच्या अंदाजपत्रकास सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

त्यामुळे गेल्या अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या शासकीय आयटीआयला इमारत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येथील शासकीय तांत्रिक विद्यालय खेड व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यशाळा व प्रशासकीय इमारत बांधकामासाठी यापूर्वी म्हणजे ३ जुलै, २००८ रोजी २ कोटी ९८ लाख ८३ हजार इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळली होती. परंतु प्रशासकीय कारणास्तव हे बांधकाम सुरु करण्यात आले नाही.

व्यवसाय च प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक यांनी खेड क्रांतिकारी अनंत कान्हेरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे खेड या संस्थेचे इमारत बांधकामासाठी निधी मिळावा म्हणून अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव शासनास सादर केला होता.

सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित सदर अंदाजपत्रके सार्वजनिक बांधकाम विभाग खेड येथील कनिष्ठ अभियंता यांनी तयार केले आहे. त्या प्रस्ताबाला राज्य सरकारने २४ मार्च २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दशकांपासून भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या शासकीय आयटीआयला हकाची इमारत मिळण्यासाठी पुन्हा एकदा आशादायी चिन्ह दिसू लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 31/Mar/2025