रत्नागिरी : येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात करिअर कट्टा विद्यार्थी संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र माहिती व तंत्र सहायता केंद्राचे अध्यक्ष डॉ. शितोळे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा, मोबाईलचा वापर किती व कशाप्रकारे करावा ते सांगितले. प्र. प्रा. मधुरा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा समन्वयक डॉ. शिवाजी उकरंडे व भादुले उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग प्रमुख व करियर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक गौरी बोटके यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्या वसुंधरा जाधव, समन्वयक प्रा. गौरी बोटके उपस्थित होते. सर्व शाखेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. राखी साळगावकर यांनी केले. प्रा. सुप्रिया येरुलकर यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 07/Oct/2024














