चिपळूण : श्री भैरी भवानी मंदिराच्या सभा मंडपासाठी १५ लाख रुपये विशेष निधी आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांतून १५ लाख विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासही त्यांनी पुढाकार घेतला.
या योगदानाबद्दल सुर्वे परिवारातर्फे आमदार शेखर निकम यांचा सत्कार करण्यात आला. आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून यापूर्वीही गडावर जाण्यासाठी शिडी उभारणी तसेच प्रचित गडावरील सभामंडपाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सत्काराप्रसंगी आमदार शेखर निकम यांनी सुर्वे परिवाराने नेहमीच समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. भविष्यातही शृंगारपूरच्या विकासासाठी मी सदैव आपल्या सोबत आहे, असे आश्वासन दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 31/Mar/2025












