खेड : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात देखील शारदीय नवरात्रौत्सव गुरुवार, दि. ३ रोजीपासून सुरू झाला आहे. सवाद्य मिरवणूक काढून अनेक मंडळांनी देवीच्या मूर्ती आणून प्राण प्रतिष्ठापना केली आहे. देवतांच्या मंदिरात जागरण गरबा, दांडिया नृत्य, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा अनंत कान्हेरे चौक, खांब तळे शेजारी, संत रोहिदास नगर आदींसह शहराजवळच्या भडगाव, खोंडे, खारी, सुसेरी आदी ठिकाणी सार्वजनिक नवरात्रौत्सवात देवीच्या भव्य मूर्ती विराजमान झाल्या आहेत. या ठिकाणास तालुक्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्री उत्सव साजरा करण्यात येत असून, त्यामध्ये दांडिया रास सोबत विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.
शहरातील श्री पाथरजाई देवस्थान, श्री खेडजाई श्री रेडजाई देवस्थान, श्री एकवीरा देवस्थान, श्री वरदानी देविस्थान, श्री महाकाली देवस्थान, श्री काळकाई देवस्थान भरणे, श्री भैरी भवानी देवस्थान आदी देवस्थानांच्या ठिकाणी देखील नवरात्रौत्सव निमित्त घट स्थापना व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नवरात्रौत्सवाच्या ठिकाणी पोलिस व गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 07/Oct/2024














