Maharashtra Weather Update: राज्यात एकीकडे उन्हाचा चटका आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा असा टोकाचा बदल होताना दिसतोय . गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा उच्चांक कायम असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 42 अंशांपर्यंत तापमान जाऊन पोहोचलंय .
बहुतांश राज्यात तापमानाचा पारा चढलेला असताना भारतीय हवामान विभागाने (IMD ) पुण्यासह 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे . वादळी वाऱ्यासह गारपीटीची ही शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे . 1 ते 4 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्याला अवकाळी पाऊस झोडपणार आहे . (Unseasonal Rain)
काय दिलाय हवामान विभागाने इशारा ?
महाराष्ट्राच्या मध्य व आजूबाजूच्या परिसरात असलेल्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यभर अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे .31 मार्चला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे .कोकणातही पावसाचा इशार आहे . दरम्यान हवामान केंद्राच्या अंदाजानुसार आज राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात होत आहे .अकोल्यात 42.3 तर चंद्रपुरात 42.4 अंश सेल्सिअस एवढे तापमान झाले आहे . राज्यभरात प्रचंड रखरख वाढली आहे .आज पासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार असून गारपिटीचाही इशारा देण्यात आलाय .
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट ?
31 मार्च
यलो अलर्ट : पुणे, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड
पालघर ठाणे रत्नागिरी सोलापूर बीड जालना जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांना अलर्ट नसला तरी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
1 एप्रिल :
ऑरेंज अलर्ट : पुणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव
यलो अलर्ट : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर ,सांगली, सातारा, नंदुरबार ,धुळे, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती
राज्यभरात रखरख वाढली; सर्वाधिक तापमानाची नोंद
राज्यात आज सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद होत असून विदर्भात असेही तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत .चंद्रपुरात सर्वाधिक 42.4 अंश सेल्सिअस ची नोंद करण्यात आली .राज्यभरातील हे सर्वाधिक तापमान होते .संपूर्ण विदर्भात पारा वाढलेला आहे .मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही प्रचंड रखरख वाढली आहे .अकोला 42.3 अमरावती, यवतमाळ, वर्धा 41.2 अंश सेल्सिअस गडचिरोली 41.4 जळगाव 40.2 बीड 41.2 सोलापूर 41.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले .छत्रपती संभाजीनगर 39 अंश सेल्सिअस होते .
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:45 31-03-2025
