खेडमध्ये कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

खेड : मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण झोन ४ च्या मुले व मुली कबड्डी स्पर्धेचे खेडमधील कदम महाविद्यालयात आ. योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून ३६ संघ सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुणबी शिक्षण प्रसारक संस्था सचिव अॅड. तु. ल. डफळे होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक बाबाजी जाधव, शिवसेना खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे, खेड कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश चिकणे, कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेडचे अध्यक्ष भि. म. गोवळकर, सहसचिव द. भि. धुमक, खजिनदार रा. पा. बैकर, कोकण झोन कबड्डी असोसिएशनचे सचिव शशांक उपशेट्ये आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 07/Oct/2024