चिपळूण : काँग्रेसच्या वरिष्ठांनी कोकणाकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याने येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे. या साऱ्या प्रकाराला कंटाळून काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील सावर्डेकर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वासह पदांचे नुकतेच राजीनामे दिले आहेत.
८ एप्रिलला ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. व गेल्या काही वर्षांपासून मूळचे कळवंडे येथील सावर्डेकर काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. पक्ष संघटना वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी आग्रही भूमिका मांडली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 01/Apr/2025














