गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारली गुढी

रत्नागिरी : गड तिथे गुढी या उपक्रमाअंतर्गत गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागामार्फत रत्नदुर्ग किल्ल्यावर महादरवाज्याजवळ गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागातर्फे ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर गुढीपाडवा सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सकाळी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यात आले.

या वेळी गडकिल्ले संवर्धन रत्नागिरी विभाग अध्यक्ष दीपेश वारंग, महिला अध्यक्ष मानसी चव्हाण, संपर्क प्रमुख तन्मय जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख समृद्धी चाळके, मयूर भितळे, भूमिका चंदरकर, सलोनी सुर्वे, सानिया पवार, प्रीतम मांडवकर, सेजल मेस्त्री, शुभम आग्रे, सुमित कदम, आदित्य कांबळे, अंकुर मांडवकर, शुभांगी जाधव, शशिकांत जाधव, विशेष उपस्थिती जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर, तालुकाध्यक्ष मंदार नैकर, मेघा कोल्हटकर, मिलिंद कोल्हटकर, यंग इन्स्पिरियटर्स नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष साहिल गोरे आणि स्थानिक नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 01-04-2025