संगमेश्वर : कानकाडीचे सुपुत्र सागर जाधव यांची चित्रे वरळीतील प्रदर्शनात

संगमेश्वर : महाराष्ट्र राज्यातील विविध कला महाविद्यालयातून वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीतर्फे विद्यार्थ्यांची निसर्गाच्या सानिध्यात चित्र रेखाटण्यासाठी निवड केली जाते.

यावर्षी नेहरू सेंटरने दोन निसर्गसंपन्न परिसरामध्ये प्रत्यक्ष निसर्गचित्र साकारण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ठिकाणांकरिता १० आणि गोव्यातील ठिकाणांकरिता ८ कलाकारांची निवड केली. त्यामध्ये तालुक्यातील कनकाडीचा सुपुत्र सागर प्रदीप जाधव यांचा समावेश होता.

राज्यातील विविध कला महाविद्यालयातून वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीतर्फे विद्यार्थ्यांची निसर्गाच्या सानिध्यात चित्र रेखाटण्यासाठी निवड होते. यामध्ये सागर जाधव यांची निवड झाली.

ही गोष्ट कनकाडी गावच्या दृष्टीने कौतुकास्पद ठरली. सागर जाधव सध्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि व्हीज्युअल आर्ट (सायन) येथे बॅचलर इन फाईन आर्टमधील द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे.

नेहरू सेंटरने आयोजित केलेल्या प्रशिक्षणात सागरने देवरूख, मार्लेश्वर, कसबा, माखजन आणि रत्नागिरी परिसरात विविध ठिकाणी प्रत्यक्ष निसर्गचित्रे साकारली होती. यापैकी सागर यांच्या आठ चित्रांचा समावेश चित्रप्रदर्शनात करण्यात आला आहे. ही सर्व चित्र सागर यांनी हॅन्डमेड पेपरवरती जलरंगात साकारली आहेत. सागर यांच्या चित्रांचा वरळीतील प्रदर्शनात समावेश झाल्यानंतर त्यांच्यावर कलाप्रेमींच्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 01/Apr/2025