चिपळूण : खरवते सरपंचपदी सुजाता सुरेश घाग यांची बिनविरोध निवड झाली. ५६ वर्षांनंतर खरवते वरचीवाडीला सरपंचपद मिळाल्याने वरचीवाडी ग्रामस्थ व महिला मंडळामध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी नूतन सरपंच घाग यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
खरवते सरपंचपद रिक्त होते. या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. सरपंचपदासाठी केवळ सुजाता घाग यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध विजयी म्हणून घोषित करण्यात आले. उपस्थित सहकारी सदस्यांनी त्यांचे कौतुक केले.
सर्व सदस्यांनी सुजाता घाग यांच्यावर विश्वास दाखवून उर्वरित काळासाठी सरपंचपदी त्यांना संधी दिल्याने घाग यांनी सर्व सदस्य व ग्रामस्थांचे आभार मानले व आपले काम प्रामाणिकपणे करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. वरचीवाडी ग्रामस्थांनी त्यांचे कौतूक केले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय ते ग्रामदेवता मंदिराकडून बेंजो वाजवीत त्यांची मिरवणूक काढण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 01/Apr/2025











