रत्नागिरी स्मार्ट सिटी विकसित करण्याच्या कामाचा आज प्रारंभ

रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विशेष निधीतून रत्नागिरी स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याच्या कामाचा प्रारंभ सोमवारी, दि. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणार असलेल्या या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, सिंधुरत्न योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, अधीक्षक अभियंता कालिदास भांडेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:01 07-10-2024