चिपळूण : कामगार नेते गोविंदराव मोहिते सत्यशोधक समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

चिपळूण : महाराष्ट्र इंटक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस, चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली गावचे सुपुत्र गोविंदराव मोहिते यांचा सत्यशोधक समाजरत्न पुरस्काराने नुकताच गौरव करण्यात आला. भायखळा (मुंबई) येथे हा कार्यक्रम झाला. सावता माळी ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी गोविंदराव मोहिते म्हणाले, सहजीवन, सहभोजन आणि सहशिक्षण ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीची मूलतत्त्वे होत. मात्र, आजच्या शिक्षण पद्धतीचे बाजारीकरण झाले आहे, अशी खंतही व्यक्त केली. यावेळी त्यांनी शेवटच्या गिरणी कामगारास घर मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. यावेळी कामगार नेते गोविंदराव मोहिते यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, कथा लेखक काशिनाथ माटल यांनाही सत्यशोधक समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 07/Oct/2024