मुंबई – जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणार की नाही, असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, बुमराह आणखी किमान दोन आठवडे मुंबईकडून सामना खेळणार नाही.
बंगळुरूच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये गोलंदाजी करतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. बुमराहला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून फिटनेस क्लीअरन्स देण्यात आलेले नाही. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पाठीच्या खालच्या भागातील दुखण्यामुळे संघाबाहेर आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील खेळला नव्हता. ‘बुमराहच्या पुनरागमनासाठी तुम्ही वेळेची मर्यादा निश्चित करू शकत नाही. त्याला पूर्ण तंदुरुस्त होऊ द्या,’ असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
इंग्लंडविरुद्ध खेळणार?
बुमराह जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका खेळेल का, याबाबत बीसीसीआय पूर्णपणे आश्वस्त नाही. बोर्डाच्या मते, तो पुनरागमनाच्या वाटेवर आहे. याचा अर्थ काय? तो शंभर टक्के फिट झाला याबाबत डॉक्टर, फिजिओ आणि स्वतः बुमराह यांच्यात एकमत झाले, तरच तो खेळू शकेल.आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्याच्या खेळण्याची शक्यता पुढील आठवड्यातील चाचणीनंतरच ठरणार आहे. आमच्या मते, तो एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात फिट घोषित होईल, असे हा अधिकारी म्हणाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 01-04-2025
