रत्नागिरी : आशा व गटप्रवर्तकांनी नियमित कामाबरोबर शासकीय योजनांची अन्य कामे केली असतील तर मासिक वेतन चिट्टीची मागणी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रमुखांकडे करावी. त्यामुळे मानधन कोणत्या गोष्टीचे मिळते हे लक्षात येईल. तसेच चिठ्ठी देण्यास अधिकारी तयार नसतील तर तसे संघटनेला त्वरित कळवावे, असे महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी बली संघटना अध्यक्ष शंकर पुजारी यांनी कडे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र शासनाने आशा व तोष गटप्रवर्तक महिलांना जी मानधन वाढ दिली आहे, ती थेट द्यावी, असे राष्ट्रीय आरोग्य अभियानांमार्फत ४ ऑक्टोबरला काढण्यात आलेल्या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे आशांना सध्या मिळणारे दहा हजार रुपये मानधन भारतात कुठेही मिळत नाही. दहा हजार रुपये मानधन वाढ सोडून भारत सरकारची कामावर आधारित मोबदला आशांना स्वतंत्र मिळणार आहे. तो शासनाच्या ७८ कामांसाठी दिला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेतन चिठ्ठी मासिक देण्याचे आदेश काढले आहेत. जर वेतन चिठ्ठी घेतली नाही, तर ठरलेले नियमित मानधन कोणते, ठोक पद्धतीने मिळणारे मानधन कोणते हे समजणार नाही. तसेच ते कोणत्या कामावर आधारित आहे याची माहिती मिळेल असे पुजारी यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 07/Oct/2024














