चिपळूण : घाणेखुंट उपसरपंच, सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, सर्व बचत गट व महिला वर्ग यांच्या सहकार्यातून पौष्टिक आहार प्रदर्शन, आरोग्य तपासणी व कुपोषण यावर मार्गदर्शन तसेच जनजागृती प्रचार-प्रसार फेरी काढण्यात आली. यामध्ये ११० महिला, किशोरवयीन मुली, गरोदर माता, बचत गट प्रतिनिधींनी सहभाग घेतला. हातात जनजागृतीचे बॅनर व संदेश फलक घेऊन घोषणा देत गावात प्रसार फेरी काढण्यात आली. परशुराम हॉस्पिटलच्या माध्यमातून महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. वैभवी अलमान यांनी आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांबाबत मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविकांनी स्त्री सबलीकरण वर मंगळागौर तर गावातील तरुणांनी कुपोषण यावर पथनाट्य सादर केले. या अंतर्गत महिलांनी पौष्टिक आहार बनवून आणले. यामध्ये रानभाज्या, तृणधान्य, फळे, कंदमुळे व मोड आलेले कडधान्ये यांचा समावेश होता. सहभागी प्रत्येक महिलेला सन्मानित करून भेटवस्तू देण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या ९ थीम पैकी २ थीम आरोग्यदायी व बालस्नेही गाव याला प्राधान्य देत महिलांना कुपोषणमुक्त व सुदृढ गाव करण्याचे आवाहन सरपंच राजू ठसाळे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 07/Oct/2024














