गोळप पावस परिसरात वानर पकडण्याची मोहीम थंडावली; उपद्रव वाढला

पावस : गोळप पावस परिसरात माकडांच्या उपद्रवाबद्दल वारंवार निवेदन व उपोषण करण्यात आली. माकडांच्या बंदोबस्ताबाबत ठोस निर्णय घेण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या परिसरात आंबा, काजू हंगाम अंतिम टप्प्यात असताना देखील वानर मागणी पकडण्याची मोहीम थंडावल्याची स्थिती पाहावयास मिळत आहे.

त्याबद्दल परिसरात शेतकऱ्यांचा नाराजीचा आहे सूर निघत माकडांचा उपद्रव आंबा, काजू बागायतदार व शेतकऱ्यांना होत असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, यासंदर्भात बागायतदार अविनाश काळे यांनी वारंवार निवेदने व उपोषण केले त्यानंतर माकडे पकडून ती निसर्ग अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्या दृष्टिकोनातून प्रायोगिक तत्त्वावरती रत्नागिरी तालुक्यातून सुरुवात करण्यात आली, त्यावेळी शेतकऱ्यांना एक समाधानाची बाब निर्माण झाली होती. गोळप, पावस परिसरातील सुरुवातीला कोळंबे येते वीस माकडे पकडण्यात आली.

त्यानंतर गेल्या ६ महिन्यांत या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले या परिसरातील अनेक ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वानर माकडे असलेल्या परिसराचा अहवाल तयार करण्यात आला. परंतु या भागामध्ये अजूनही संबंधित विभागाने माकडे पकडण्यास सुरुवात केलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या संदर्भात आंबा बागायतदार व उपोषणकर्ते अविनाश काळे म्हणाले की, संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे. सुरुवातीच्या काळात थोडासा प्रयत्न करण्यात आला, त्याला यश मिळाल्याने त्यांनी आपली मोहीम अन्य ठिकाणी वळवली आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी विशेष लक्ष देऊन काम केल्यास त्यांचे उद्दिष्ट नक्कीच सफल होईल त्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू करणे काळाची गरज आहे, अन्यथा सर्व शेतकऱ्यांना आपले व्यवसाय बंद करण्याची पाळी येईल. कारण एवढ्या प्रमाणात माकडांची पैदास सुरू आहे – अविनाश काळे, आंबा बागायतदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 02/Apr/2025