Shani Budh Yuti 2025 : तब्बल 30 वर्षांनंतर होणार बुध आणि शनीची युती; ‘या’ राशींना होणार लाभ

Shani Budh Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहांची स्थिती ठराविक अंतराने बदलत असते. तसेच, प्रत्येक ग्रह काही कालावधीने नक्षत्र परिवर्तन केल्याने युती जुळून येते.

याचा प्रभाव सर्व जगभरात होतो. वैदिक पंचांगानुसार, 3 एप्रिल रोजी बुध (Mercury)ग्रह गुरुच्या नक्षत्रात म्हणजेच पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनी (Shani Dev)ग्रह आधीपासूनच पूर्वाभाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. त्यामुळे या ठिकाणी बुध आणि शनीची युती होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या राशी (Zodiac Signs)कोणत्या ते जाणून घेऊयात.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीची युती फार लाभदायक ठरणार आहे. या कालावधीत तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसून येईल. तसेच, धनसंपत्तीत वृद्धी येण्याचे योग जुळून येणार आहेत. नोकरीत पदोन्नतीची संधी तुम्हाला मिळू शकते. या काळात तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळेल.

वृषभ रास (Taurus Horoscope)

बुध आणि शनी ग्रहाची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी फार सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवू जाऊ शकतात. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. या काळात तुम्ही परदेशात यात्रा देखील करु शकता. मुलांना नवीन गोष्टी शिकवा. ते चांगलं आत्मसात करतील.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी शनी आणि बुध ग्रहाचा संयोग फार अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमचं चारचौघात व्यक्तिमत्तव उठून दिसेल. तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ पाहायला मिळेल. तसेच, बेरोजगारांना चांगला लाभ मिळेल. मुलांच्या कलागुणांचा चांगला वाव मिळेल. तसेच, कोर्ट कचेरीच्या संदर्भात सुरु असलेले वाद लवकरच संपतील. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, तुम्ही या कालावधीत नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तुम्हाला चांगलं यश मिळेल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 02-04-2025