Abu Azmi on Waqf Amendment Bill : वक्फ दुरुस्ती विधेयकाला जे समर्थन करत आहेत ते खोटे मुस्लिम आहेत, खरे मुस्लिम वक्फ विधेयकाच्या विरोधात उभे आहेत. जोपर्यंत हे जग आहे, तोपर्यंत ही जमीन अल्लाहच्या नावावर राहील.
जी काही कमतरता आहे ती आपण दुरुस्त करू, मात्र तसे न करता आपण संपूर्ण कायदाच बदलू का? असा सवाल करत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी वक्फ बिलाबद्दल (Waqf Amendment Bill) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे आणि एनडीएच्या सेक्युलर लोकांनी हे विधेयक मंजूर होऊ देऊ नये. असे आवाहन देखील त्यांनी केले आहेत.
सरकार ज्यांच्या ताब्यात आहे त्या लोकांना मुस्लिमांना अपमान करण्याची आणि त्यांना नष्ट करण्याची सवय आहे. मुस्लिमांचा अपमान आणि छळ करण्यासाठी प्रथम सीए एनआरसीचा मुद्दा आणला, पण तो आमच्यासाठी दगड आणि इतरांसाठी फूलं असा ठरला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावे? देश सोडावा का? किंवा आम्हाला विष द्या, आम्हाला मारा. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल कायदा रद्द करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. जेणेकरुन UCC लागू करता येईल. वक्फमधील दुरुस्ती आम्ही कधीही सहन करू शकत नाही. जोपर्यंत मुस्लिम पर्सनल बोर्ड हे मान्य करत नाही, तोपर्यंत देशातील एकही मुस्लिम हे मान्य करणार नाही, भारत सरकार आदेश आणेल, मात्र आम्ही हे मान्य करणार नाही. असा इशाराही आमदार अबू आझमी यांनी दिला आहे.
ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडी सोबत विरोधात?
दरम्यान, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर शिवसेना ठाकरे गटाची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याचे बघायला मिळाले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका चर्चेवेळी उघड होणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडी सोबत विरोधात राहणार असल्याची सूत्रांची माहिती पुढे आली आहे. सरकारमधील भाजपसोबतचे घटक पक्ष नेमकी काय भूमिका घेणार? याकडे ठाकरेंच्या शिवसेनेचा लक्ष होतं. मात्र यामध्ये नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चंद्रबाबू नायडू यांनी तीन दुरुस्ती सुचवत या विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकातील काही मुद्द्यांवर JPC मध्ये बोट ठेवत ठाकरेंच्या शिवसेनेकडून सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. ता याचा विचार या बिल मांडल्यानंतर झाला आहे का? हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाहिलं जाईल. भाजपसोबत असलेले मित्रपक्ष यामध्ये चंद्रबाबू नायडू नितिश कुमार यांनी जरी या विधेयकाला पाठिंबा दिला असला तरी चर्चदरम्यान या सगळ्या संदर्भात त्यांच्या पक्षांची भूमिका काय आहे? हे सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाहिले जाणार आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
त्यानंतर या विधेयकासंदर्भात ठाकरेंची शिवसेना आपली भूमिका मांडणार असल्याचं कळतंय. मात्र या दरम्यान इंडिया आघाडीच्या झालेल्या कालच्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीतील सर्व पक्ष एकत्रित या विधेयकाला विरोध करणार असल्याचे ठरले आहे. त्यामुळे ठाकरेंचे शिवसेनेने जरी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली असली तरी या विधेयकाला विरोध ठाकरेंच्या शिवसेनेकडून केल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व लोकसभा खासदारांनी आज लोकसभेत हजर राहून चर्चेत सहभागी व्हावे अशा प्रकारचे व्हीप पक्षाकडून बजावण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 02-04-2025














