मुंबई : Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने निवडणुकांपूर्वी सुरु केलेली लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही.
त्यातच लाडकी बहीण योजनेसाठी निकषही लावण्यात आले आहेत. यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या. त्यातच राज्याच्या तिजोरीवर भार आल्याने लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे बोललं जात आहे. आता लाडकी बहीण योजनेवरुन ठाकरे गटातील एका नेत्याने टीका केली आहे. ( Ladki Bahin Yojana )
ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विनायक राऊत यांनी लाडकी बहिण योजनेबद्दल भाष्य केले आहे. यावेळी विनायक राऊत यांनी लाडकी बहीण योजनेला अजित पवार टाळ मारणार असल्याचा मोठा दावा केला आहे. ( Ladki Bahin Yojana )
अजित पवार या योजनेला टाळ मारतील
दुदैवाने राज्यकर्त्यांची गरज सरो आणि वैद्य मरो अशी अवस्था आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि आता त्याच काम संपलं. त्यामुळे 1500 रुपये तरी मिळतील का अशी शंका आहे. महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुका झाल्या की अजित पवार या योजनेला टाळ मारतील, असे विनायक राऊत म्हणाले. ( Ladki Bahin Yojana )
ते राज्यकर्त्यांचे पोषणकर्ते
बीड हा राख माफियांचा जिल्हा झाला आहे. शेकडो हत्या झाल्यात पण उघड झाल्या नाहीत. त्यांचा बिमोड करावा हे चॅलेंज देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं. गोवा बनावटीची दारु राजरोस विकली जातं आहे, ते राज्यकर्त्यांचे पोषणकर्ते आहेत, असे विनायक राऊतांनी म्हटले.
लाडक्या बहिणी प्राथमिक लाभापासून वंचित
विधानसभेमध्ये मतदारांना फसवायचे, थापेबाजी करायची आणि त्यांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे सरसकट रक्कम जमा केली. आता त्यांचं काम फसलेला आहे. त्यांना गरज भासलेली नाही. त्यामुळे 2100 तर सोडा, पुढच्या अर्थसंकल्पात 1500 रुपये मिळतील का? हेही शंका आहे. किमान 30 ते 35 लाख लाडक्या बहिणी प्राथमिक लाभापासून वंचित होतील. शिल्लक राहिलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत रेटत राहिले जाईल. येणाऱ्या अर्थसंकल्पात अजित पवार साहेब याला टाळ मारतील. दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या या सध्याच्या राज्यकर्त्यांची गरज सरो वैद्य मरो अशी भूमिका आहे. आता त्यांचं काम संपलेला आहे, लाभाचे निकष आता ठरलेले नाही, हे पूर्वीपासून ठरलेले आहेत, असे विनायक राऊत म्हणाले. ( Ladki Bahin Yojana )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 02-04-2025
