चिपळुणात प्रत्येक रविवारी ‘वाचू आनंदे’ उपक्रम

चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर (लोटिस्मा), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चिपळूण नगर परिषद यांच्यावतीने या महिन्यापासून प्रत्येक रविवारी वाचू आनंदे या उपक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी ८ ते १० या वेळेत निसर्गरम्य ठिकाणी वाचनाचा उपक्रम प्रत्येक रविवारी घेण्यात येणार आहे.

चिपळुणातील लोटिस्मा वाचन मंदिरास १६० वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच चिपळूण न.प.च्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. या दोन्ही वाचनालये व चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने या महिन्यापासून प्रत्येक रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत वाचू आनंद उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

रविवार दि. ६ एप्रिल रोजी शहर परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी सकाळी ८ ते १० या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोबाईल व सोशल मीडियामुळे सध्या पुस्तक वाचन कमी झाले आहे. नव्या पिढीला पुस्तक व साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असून, हा उपक्रम येत्या रविवारी गांधारेश्वर मंदिर परिसरात राबविण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 02/Apr/2025