रत्नागिरी : जिल्हापोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांचे वडील रामचंद्र विठ्ठल कुलकर्णी यांचे आज वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या रत्नागिरी येथील निवासस्थानी होते. वडिलांचे निधन होताच जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी वडिलांचे पार्थिव घेऊन त्यांचे मूळ गाव भांडगाव, तालुका श्रीगोंदा येथे रवाना झाले. उद्या सकाळी ७ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.














