लांजा : तळवडे येथील जगन्नाथ पेडणेकर हायस्कूलला शालेय खो-खो स्पर्धेत यश

लांजा : लांजा हायस्कूलच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या लांजा तालुका स्तरीय १४ वयोगटातील खो- खो स्पर्धेत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेचे मुले व मुलीगटातील दोन्ही संघ विजयी झाले. मुलांचा अंतिम सामना लांजा हायस्कूल विरुद्ध पेडणेकर विद्यालय तळवडे तर मुलींचा अंत्तिम सामना आश्रमशाळा जावडे विरुद्ध पेडणेकर विद्यालय तळवडे यांच्यामध्ये झाला.

गतवर्षीची विजयी परंपरा राखण्यात तळवडे हायस्कूलचे दोन्ही संघ यशस्वी ठरले आहेत. मुलांच्या अंतिम सामन्यात्त प्रसाद पाष्टे, चेतन इंगळे, श्रेयस तिखे, प्रयाग नामये, तनीश तिखे, समर्थ साळवी यांनी उत्कृष्ट खेळ केला. मुलगे चेतन इंगळे, (कर्णधार) प्रसाद पाष्टे, श्रेयस तिखे, तनीश तिखे, प्रयाग नामये, समर्थ साळवी, सौरभ कामेरकर, रोहित इंगळे, शुभम इंगळे, चिराग पाटोळे, सोहम इंगळे, सोहम गुरव, आदित्य नामये, गुरुरुप्रसाद इंगळे, पार्थ आगरे.

मुलींच्या गटामध्ये जान्हवी गुरव (कर्णधार) उज्ज्वला दरडे, सृष्टी शिंदे, तन्वी इंगळे, गायत्री दरडे, पौर्णिमा दरडे, आश्लेषा पडघे, अनुष्का खामकर, तन्वी मांडवकर, सान्वी दरडे, प्राची मेस्त्री आराध्या माने, शितल गुरव, सार्थकी पांचाळ, गार्गी राऊळ या खेळाडूंचा सहभाग होता.

प्रशिक्षक सुशील वासुरकर, विजय पाटोळे, क्रीडा विभाग प्रमुख गणेश झोरे यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक डी. बी. पाटील, शिक्षक प्रकाश हर्वेकर, नेहा पाटोळे, स्वरा बासुरकर, सुवारे मॅडम, सावंत मॅडम शिक्षकेतर कर्मचारी सुमम पाटोळे, अविनाश चव्हाण, जनार्दन पाटोळे यांचे सहकार्य मिळाले.

प्रशालेच्या या यशाबद्दल तळवाडे शिक्षणोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंद जगनाथ पेडणेकर, व पदाधिकारी मुंबई कमिटी, स्थानिक कमिटी, शाळा समिती यांनी अभिनंदन करून जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 07/Oct/2024