जनशताब्दी, तेजससह तीन एक्स्प्रेस गाड्या ठाणे, दादरपर्यंत धावणार !

रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन एक्स्प्रेस गाड्या या ठाणे तसेच दादरपर्यंत धावणार आहेत. हा बदल १५ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वे माहितीनुसार गाडी क्रमांक १२१३४ ही मंगळुरू ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी गाडी दि. १५ एप्रिल २०२५ पर्यंत निर्धारित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ऐवजी ठाणे स्थानकापर्यंत धावणार आहे.

याचबरोबर गाडी क्रमांक २२१२० ही मडगाव जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस दि. १५ एप्रिल २०२५पर्यंत निर्धारित सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंतच जाणार आहे.

मडगाव ते मुंबई दरम्यान धावणारी दैनंदिन जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०५२) ही गाडी देखील दि. १५ एप्रिल २०२५ पर्यंत दादरस्थानकात आपला प्रवास संपवणार आहे. एरव्ही ही गाडी देखील नेहमी मडगाव ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:52 AM 03/Apr/2025