लांजा : लांजा तालुक्यातील ग्रामपंचायत खानवली लावगण, मांडवकरवाडी रस्त्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. गेली अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांना रस्त्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र, सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत खानवली, लावगण, मांडवकरवाडीच्या रस्त्याला जनसुविधे अंतर्गत ७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.
किरण सामंत यांच्या उपस्थितीत गावातील प्रमुख नागरिकांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. ग्रामपंचात खानवली, लावगण, मांडवकरवाडीच्या रस्त्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. रस्त्याप्रश्नी कोणीही न्याय देत नसल्याने व फक्त आश्वासनाशिवाय काही मिळाले नसल्याने ग्रामस्थ पूर्णतः नाराज झाले होते. अखेर त्यांनी किरण सामंत यांची भेट घेतली. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन पालकमंत्री उदय सामंत पांचे सहकार्य आणि जनसुविधेच्या माध्यमातून ७ लाख रुपयांचा निधी रस्त्यासाठी उपलब्ध करून दिला.
यावेळी तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, जिल्हासरचिटणीस यशवंत वाडे, एस. एन, कांबळे, तालुकासचिव वसंत घडशी, विभागप्रमुख अनिल गुरव उपविभागप्रमुख सुधीर तेंडूलकर, नगरसेवक नंदराज कुरूप, मनोहर भिडे, शंकर गोरे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
मागील १५ वर्षे विकास हरवला
लांजा तालुक्यात मागील १५ वर्षे विकास कुठे हरवला याचा शोध घ्यावा लागेल, विकासाच्या नावावर कागद दाखवून मत मागायला आलो नाही तर तुमचे प्रश्न मार्गी लावून तुमच्या भेटीला आलो आहे. सरकारच्या योजनांचा लाभ सगळ्यांनी घ्यावा, असे आवाहनही किरण सामंत यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:08 PM 07/Oct/2024














