रत्नागिरी : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सुरक्षित किनारा, समृद्ध भारत या संकल्पनेवर आधारित ग्रेट इंडियन कोस्टल सायक्लोथॉनची कन्याकुमारी येथे नेत्रदीपक कार्यक्रमाने सांगता झाली. भारताच्या किनारी भागाचे संवर्धन करण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे. रत्नागिरीमध्येही यामधील सहभागी सायकलपटूंचे जंगी स्वागत करण्यात आले होते.
कन्याकुमारी येथे विवेकानंद रॉक मेमोरियल आणि तमिळ संत आणि तत्त्वज्ञ चिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याजवळ हा समारोप कार्यक्रम झाला. उपस्थितांनी किनारी भागाचे सौंदर्य आणि महत्त्व अधोरेखित केले, पर्यावरण संरक्षण आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यावर भर दिला.
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सायक्लोथॉनचे उद्घाटन झाले होते. यात सुरक्षा दलाच्या १४ महिलांसह १२५ सायकलपड्डू आणि १२०० हून अधिक सायकलस्वारांनी विविध टप्प्यांत भाग घेतला. पारादीप बंदर, कोणार्क सूर्य मंदिर, गेटवे ऑफ इंडिया (मुंबई), विशाखापट्टणम, मंगलोर, चेन्नई, कोचीन आणि पुदुचेरी यासारख्या प्रमुख किनारी शहरे आणि देशातील महत्त्वाच्या ठिकाणी स्वागत आणि ध्वजवंदन समारंभ आयोजित करण्यात आले. सायक्लोथॉनला मान्यवर दिग्गज कलाकार, खेळाडूंनी पाठिंबा दिला.
स्थानिक संवादांसाठी ११८ कार्यक्रम आयोजित केले. किनारी सुरक्षा आणि किनारपट्टीवरील जीवनातील आव्हाने यावर लक्ष केंद्रित केलेल्या चर्चेत विचार आणि दृष्टिकोनांची देवाणघेवाण झाली. प्रादेशिक विशिष्ट गाणी, नृत्य, मार्शल आर्टस्, वेशभूषा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाने विविध किनारी क्षेत्रांना भेडसावणारी विशिष्ट आव्हाने आणि असुरक्षिततेची सखोल माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 03/Apr/2025














