रत्नागिरी नगर परिषदेतर्फे मांडवी समुद्र किनारी स्वच्छतेची शपथ

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतर्फे मांडवी समुद्रकिनारी स्वभाव स्वच्छता… संस्कार स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेचा पंधरवडा पूर्ण झाल्यानंतर स्वच्छता मोहिमेत भाग घेणाऱ्यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छ भारत अभियान पंधरवडा राबवण्यात आला. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या सूचनेनुसार मांडवी समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेदरम्यान स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. रत्नागिरी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी शिर्के, पटवर्धन, जांभेकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी या मोहिमेत भाग घेतला. यातील अनेकांना स्वच्छता मित्र म्हणून पुरस्कार देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:27 PM 07/Oct/2024