रत्नागिरी : राजिवडा येथील श्री देव विश्वेश्वर मंदिर भक्तनिवास बांधकामाचा शुभारंभ

◼️ ज्या ज्या सुविधा कराव्या लागतील, त्या शासनाकडून केल्या जातील : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : राजिवडा येथील श्री देव विश्वेश्वर मंदिर भक्तनिवास बांधकामासाठी १ कोटी ७५ लाखांचा निधी दिला, म्हणजे माझी जबाबदारी संपली नाही. मंदिरासाठी ज्या ज्या सुविधा कराव्या लागतील, त्या त्या शासनाकडून केल्या जातील, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, प्रादेशिक पर्यटन विभाग योजनेंतर्गत राजिवडा येथील श्री देव विश्वेश्वर मंदिर भक्तनिवास बांधकामाचा शुभारंभ कुदळ मारुन व कोनशिला अनावरण करुन आज करण्यात आले. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, देशातील, परदेशातील पर्यटक इथे कसा येईल, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा केल्या जातील. श्री देव विश्वेश्वर माझ्याकडून काम करुन घेत आहे. याचे सर्व श्रेय रत्नागिरीकरांना जाते. मी यासाठी स्वत:ला भाग्यवान समजतो.

यावेळी माजी नगराध्यक्ष राहूल पंडित, आबा घोसाळे, प्रविणशेठ वायंगणकर, सुहेल मुकादम, दिपक सुर्वे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:25 07-10-2024