Maharashtra Politics: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते आशिष शेलारांची भेट; चर्चेला उधाण..

चंद्रपूर : काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांची भेट झाली असून या भेटीमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात काही शिजतय का? की ही निव्वळ एक सदिच्छा भेट होती याबाबत शंका निर्माण झाली आहे.

भाजप नेते आशिष शेलार हे सोमवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. नागपूरकडून नागभीड आणि नागभीडकडून चंद्रपूरला येत असताना वडेट्टीवार आणि शेलार यांची भेट झाली.

नागभीड जवळ असलेल्या पळसगाव येथे वडेट्टीवार आणि शेलार यांची भेट झाली. त्यानंतर शेलार, वडेट्टीवार आणि चिमूरचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी एकाच गाडीतून मुलपर्यंत प्रवास केला.

विशेष म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात विजय वडेट्टीवार आणि बंटी भांगडिया यांच्यात जुना संघर्ष आहे. त्यानंतर मूल MIDC येथे तयार होत असलेल्या विजय वडेट्टीवार यांच्या बायोडीजल प्लांटमध्ये या तिघांमध्ये पुन्हा पंधरा ते वीस मिनिटं चर्चा झाली.

त्यामुळे जिल्ह्याच्या भेटीदरम्यान आशिष शेलार आणि विजय रेड्डी यांच्यामधील ही भेट निव्वळ योगायोग होता, की यामागे काही राजकीय संदर्भ आहेत? हे येणाऱ्या काही दिवसात कळू शकेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 04-04-2025