चिपळूण रेल्वे स्थानकावर ‘पे अॅण्ड पार्क’ची सुविधा

चिपळूण : चिपळूण रेल्वे स्थानकाच्या आवारात वाहने उभी करणाऱ्या प्रवाशांना आता पार्किंग साठी पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी केलेला खर्च रेल्वे महामंडळ आता प्रवाशांच्या खिशातून वसूल करणार आहे. कोकण रेल्वेच्या लोहमार्गावरील काही रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात आले.

या स्थानकांवर प्रवाशांना विमानतळासारखी सुविधा विकत दिली जात आहे. विमानतळावर प्रवाशांना विश्रांती करण्यासाठी वातानुकूलित कक्षाची सुविधा मिळते. अशाच प्रकारची सुविधा रेल्वे स्थानकावर विशेष अतिथी कक्षाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या कक्षाचा लाभघेणाऱ्यांकडून तासाला दोनशे रुपये आकारले जाते.

रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच सुसज्ज पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. तेथे दुचाकींसाठी स्वतंत्र आणि चार चाकीसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था पे अॅण्ड पार्कच्या कर आकारणीचा ठेका गोव्यातील एका एजन्सीला देण्यात आला आहे. या ठिकाणी वाहने उभे करणाऱ्या प्रवाशांकडून भाडे घेतले जात आहेत. दुचाकी उभे करणाऱ्या प्रवाशांकडून २४ तासासाठी ४० रुपये आकारले जातात.

येथील रेल्वे स्थानकावर पे अॅण्ड पार्कची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकी चोरीचे प्रकार थांबतील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. मात्र, पे अॅण्ड पार्कसाठी भाडे जास्त आकारले जात असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. २४ तासाला ४० रुपये ऐवजी १० रुपये नाममात्र शुल्क घ्यावे, कारण ही आवश्यक सुविधा आहे. – अन्वर मुकादम, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 04/Apr/2025