रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे एप्रिल 2025 चा लोकशाही दिन सोमवार दि. 7 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दु.1 ते 2 वा. या वेळेत होणार आहे.
लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:51 PM 04/Apr/2025
