रत्नागिरी : वाटद परिसरातील शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या हिताचा आणि देशाच्या संरक्षणाचा प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील वाटद परिसरात होत आहे. जागेचे थेट पैसे रिलायन्स कंपनी शेतकऱ्यांकडे पाठवणार आहे. त्यामुळे कमिशन एजंटच्या कुठल्याही गैरसमजाला बळी पडून शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

सामंत यांनी म्हटले आहे, महाराष्ट्र सरकारतर्फे दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत रत्नागिरीत दोन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील एक डिफेन्स क्लस्टर आहे. तो रत्नागिरी तालुक्यातील वाटद परिसरात होणार आहे. कमिशन एजंट जागा खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत असतील, तर तेथील शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. कुठल्याही शेतकऱ्यांनी स्वतःची जागा विकू नये. जागेचे थेट पैसे रिलायन्स कंपनी आपल्याकडे थेट पाठवणार आहे.

कुठल्याही गैरसमजाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. शेतकऱ्यांच्या हिताचा आणि देशाच्या संरक्षणाचा प्रकल्प या परिसरात येत आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प केला जाईल. शेतकऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग होऊ देणार नाही, असेही पालकमंत्री सामंत म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 08/Oct/2024