राजापूर आयटीआयमध्ये मानधन तत्त्वावर टंकलेखन लिपिक पदाची भरती

रत्नागिरी : राजापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपअंतर्गत संस्था व्यवस्थापन समितीच्या कामाकाजाकरिता तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर टंकलेखन लिपिक नेमायचा आहे.

गरजू उमेदवारांनी संस्थेच्या पत्त्यावर १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन राजापूर आयएमसी ऑफ आयटीआयचे सचिव टी. एस. मिसाळ यांनी केले आहे.

उमेदवाराचे वय वर्षे २१ ते ३८ वर्षापर्यंत असावे. किमान वाणिज्य शाखेतील पदवी, संगणक ज्ञान, टॅली, टंकलेखन मराठी-इंग्रजी, ऑनलाइन कामकाज हातळण्याचे ज्ञान ही शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हतेनुसार किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. दरमहा १२ हजार रुपये आणि ५ टक्के वार्षिक दरवाढ असे वेतन असेल.

कार्यालयीन कामकाजाकरिता प्रवास करावा लागेल. ११ महिने नियुक्ती कालावधी व कामकाज समाधानकारक असल्यास पुढील २ वर्षाकरिता प्रत्येकी ११ महिन्यांची नियुक्ती केली जाईल. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारास समान संधी मिळेल. दरवर्षी ११ महिन्यांचे बंदपत्र देणे अनिवार्य राहील. कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याविषयी तरतूद नाही. अनुभव प्रमाणपत्र अथवा सेवेत कार्यरत असलेला कोणताही दाखला अथवा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. ही योजना केंद्र शासन पुरस्कृत असल्याने योजना चालू असेपर्यंतच सेवेत कार्यरत ठेवण्यात येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 05-04-2025