रत्नागिरी : देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शैक्षणिक साहित्य प्रदर्शनास प्रतिसाद

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभाग आणि आयक्यूएसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाणिज्य शैक्षणिक साहित्य (कॉमर्स टीचिंग एड) प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला.

वाणिज्य शाखेतील ५० विद्यार्थ्यांनी वाणिज्यवर आधारित २० मॉडेल सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी त्याचे सादरीकरण केले. महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनास महाविद्यालयातील व पटवर्धन कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका व शिक्षक अशा सुमारे २०० हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी भेट दिली. या कार्यक्रमाला उपप्राचार्या वसुंधरा जाधव, वाणिज्य शाखेच्या विभाग प्रमुख प्रा. राखी साळगावकर, वाणिज्य शाखेतील प्रा. वैभव कीर, प्रा. सुप्रिया येलूरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गौरवी ओळकर (प्रथम वर्षं वाणिज्य) हिने केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 08/Oct/2024