रत्नागिरी : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त रविवार, दि. ६ एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
ग्रुप ग्रामपंचायत वाटद मिरवणे, साधना फाउंडेशन मुंबई, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या विशेष सहकार्याने व शालेय व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 05/Apr/2025














