संगमेश्वर : चिखली कानालवाडी येथील रस्त्यावरील फरशीला भगदाड; वाहतुकीस धोका

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील चिखली कानालवाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या चिखली तांबेडी रस्त्यावरील फरशीला दोन ठिकाणी मोठी भगदाडे पडली आहेत. गेले महिनाभरात याठिकाणी दुचाकीचे अनेक अपघात घडून आले आहेत. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चिखली तांबेडी रस्त्यावर कानालवाडी येथे एक फरशी बांधण्यात आली आहे. मुळातच ही फरशी कमी उंचीची असल्याने पावसाळ्यात अनेक वेळा पाणी भरल्याने हा मार्ग बंद होत असतो. त्यातच निकृष्ठ कामामुळे या फरशीला अनेक ठिकाणी मोठ-मोठी भगदाडे पडली आहेत.

त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. गेल्या महिनाभरात याठिकाणी दुचाकी तसेच रिक्षाचे अनेक अपघात घडून आले आहेत. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे येथील रिक्षा संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने अध्यक्ष मिलिंद चव्हाण व उपाध्यक्ष संदीप चिले यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 07/Apr/2025