Temperature today: अवकाळीनंतर पुन्हा उष्णतेच्या लाटांना सुरुवात! संपूर्ण कोकणपट्ट्यात उष्मा वाढला

राज्यात अवकाळी पावसाच्या फटकाऱ्यानंतर आता पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटांना सुरुवात होत असल्याचे इशारे हवामान विभागाने दिले आहेत.

गेल्या काही दिवसांत राज्यात पावसामुळे तापमानात काहीसा दिलासा मिळाला असला तरी आता प्रचंड उन्हाचा चटका आणि उष्णतेच्या तीव्र झळा बसू लागल्यात.

आज राज्यभरातले कमाल तापमान प्रचंड असून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी 40 अंशांच्या पुढे तापमान गेलंय.

आज पुण्यात 38 अंश तापमान आज नोंदवलं गेलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 39.4 अंश तापमानाची नोंद आहे. बीड, सोलापूर आज 39 अंशांवर आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणपट्ट्यात प्रचंड तापमानाची नोंद होत असून उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यात पालघर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.

पुढील पाच दिवस राज्यात तापमानाचा पारा चढाच राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 07-04-2025