Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी कर्जमाफीच्या ( loan waiver) मुद्यावरुन शेतकऱ्यांबाबत (Farmers) केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.
कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला होता. यावरुन त्यांच्यावर टीका होत होती. यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे. मी शेतकऱ्यांबाबत असं वक्तव्य केलं नाही असे कोकाटे यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची वेळच येऊ नये ही सरकारची भावना
शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही असं मी म्हणालोच नाही असे माणिकराव कोकाटे म्हणाले. शेतकऱ्यांना कायमस्वरुपी सक्षम करणं ही काळाची गरज आहे असं मी म्हणालो होतो. शेतकरी समृद्ध कसा होईल, त्याचा भांडवली खर्च कसा कमी होईल, उत्पादनाचे मार्केटिंग कसे करता येईल यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे कोकाटे म्हणाले. यावेळी माझे एक शेतकरी मित्र तिथे होते. यावेळी व्यक्तिगत माझे त्यांच्याशी संभाषण सुरु होते. जिथं जिथं शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तिथे पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. मदत मिळणार नाही असे मी म्हणालो नाही. पण मदतीच्या पलिकडे जाऊन शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी सरकार योजना आणणार आहे. शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची वेळच येऊ नये ही सरकारची भावना आहे असे कोकाटे म्हणाले.
कर्जमाफी होणार नाही असे मी कुठेही म्हणालो नाही
मी ज्या शेतकऱ्याशी बोलत होतो, तो माझा मित्र आहे. त्याच्याशी थट्टा मस्करीत मी बोलत होतो असे कोकाटे म्हणाले. त्या माझ्या वक्तव्याचा सगळ्या शेतकऱ्यांशी संबंध नाही असे कोकाटे म्हणाले. व्यक्तिगत मित्राशी मी बोललो आहो. त्याची मस्करी करत होतो. कर्जमाफी करणार नाही मी असेही कुठेही म्हटलो नाही असे कोकाटे म्हणाले. तो विषय माझा नाही असे मी म्हणाल्याचे कोकाटे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे?
जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावं. कर्ज घ्यायचं आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचं नाही असे मामिकराव कोकाटे म्हणाले. तसेच कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का? असा सवाल त्यांनी केला होता. सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा,” असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 07-04-2025














