दुग्ध उत्पादनाच्या चळवळीत कोकणास पहिल्या क्रमांकावर आणणार : प्रशांत यादव

मंडणगड : दुग्ध उत्पादनाच्या चळवळीत कोकणास पहिल्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प आहे. वाशिष्ठी डेअरीच्या रुपाने रत्नागिरी जिल्ह्यात सहकार तत्त्वावर उभ्या रहात असलेल्या दुग्ध उत्पादनाच्या चळवळीत मंडणगड तालुक्याने अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले असल्याचे प्रतिपादन वाशिष्ठी मिल्क अँण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी तिडे येथे केले.

यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रमेश दळवी, तिडे ग्रामपंचायतीच्या सरपंच मुमताज धनसे, कादीवली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद माने, उपसरपंच राजेश जाधव, नानु खैरे, संतोष राणे, निखील दळवी, संकेत घोसाळकर शिवाजी माने, विजय खैरे, मोहन दळवी, शंतनू साळुंखे, संदीप साळुंखे व तालुक्यातील दुग्ध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 07/Apr/2025