रत्नागिरी : अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे नेट-सेट कार्यशाळा

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे येत्या १८ ते २० एप्रिल या कालावधीत सकाळी १० ते ५ या वेळेत नेट-सेट मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

अकादमीतर्फे दरवर्षी नेट-सेट मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येते. दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी त्यामध्ये आपला सहभाग नोंदवून उत्तीर्णही होतात. अकादमीमधून मार्गदर्शन घेऊन बरेच विद्यार्थी नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन विविध महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहेत. या वर्षी तेजस कळंबटे (एम. ए. इतिहास- युजीसी नेट २०२३, सेट २०२४) व राधेय पंडित (एम. ए. समाजशास्त्र) सेट २०२३) हे विद्यार्थ्यांना सेट व नेट परीक्षांसाठी मार्गदर्शन करणार आहेत. एमए, एमकॉम, एमएस्सी करणारे व उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे सेट-नेट परीक्षा देऊ शकतात. ज्यांना या परीक्षेसाठी आयोजीत कार्यशाळेत सहभाग घ्यायचा असेल त्यांनी गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या जे.एस.डब्ल्यू बिल्डींगमधील अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:41 07-04-2025