रत्नागिरी : राज्यात प्रत्येक विद्यार्थ्याला एकच गणवेश असावा म्हणून ‘एक राज्य एक गणवेश’ योजना सुरू करण्यात आली होती. मात्र यामध्ये गोंधळ झाला. शाळा संपली तरी काही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणवेश देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील, अशी आशा आहे.
जिल्ह्यातील २ हजार ५०० शाळा वितरण समितीवर आता पुन्हा एकदा गणवेशाची जबाबदारी असणार आहे.
गेल्या वर्षीच्या गणवेश वितरणात मोठा गोंधळ झाला. सुरुवातीला वेळेत कापड आलेच नाही. त्यानंतर कापड एकाने पुरविले, त्याचे कटिंग दुसऱ्याने केले. शिवणकाम तिसऱ्याने आणि वितरण चौथ्याने अशी अवस्था झाली. अनेक विद्यार्थ्यांना विगरमापाचा गणवेश मिळाला, तर अनेकांना मिळालाच नाही. काही गणवेश शिक्षण विभागाकडून, तर काही गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळाकडून देण्यात आले. या गोंधळात १०० टक्के नाहीत.
विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेच यावर्षी गणवेशासाठीचा निधी थेट शाळा समितीकडे दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच त्यांच्या मापाचे गणवेश मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखभर विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळतील अशी आशा आहे. शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश मिळणार आहेत.
रंग, डिझाईन अन् वितरणही करणार शाळा समितीच…
राज्यभर झालेल्या गोंधळामुळे शाळा व्यवस्थापन समितीकडेच गणवेशाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कापडाच्या खरेदीपासून त्याचे शिवणकाम आणि वितरण ही कामे व्यवस्थापन समिती करेल. गणवेशाचे डिझाईन, रंग ठरविण्याचे अधिकारही समितीलाच असणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 PM 10/Apr/2025














