चिपळुणात जलतरण तलावाचे लोकार्पण

चिपळूण : शहरातील जलतरण तलावाचे लोकार्पण आमदार शेखर निकम यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी आ. निकम यांनी जलतरण तलावाच्या कामाची पाहणी करून मुख्याधिकारी विशाल भोसले यांना काही सूचनाही केल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, शिवसेना (शिंदेगट) तालुका अध्यक्ष संदेश आयरे, भाजपचे माजी नगरसेवक विजय चितळे, महंमद फकीर, करामत मिठागरी, उदय ओतारी, युवक शहर अध्यक्ष सिद्धेश लाड, युवक उपाध्यक्ष अनिकेत ओतारी, शिवसेना महिला शहर अध्यक्ष प्राजक्ता टकले, राणी महाडिक, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष रवीना गुजर, तालुका उपाध्यक्ष पूर्वा आयरे, राष्ट्रवादी महिला क्षेत्राध्यक्ष मनाली जाधव, महिला शहर उपाध्यक्ष पूनम भोजने, चिपळूण नगर परिषद प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर, बापू साडविलकर आदींसह चिपळूण नगर परिषद कर्मचारी व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 08/Apr/2025