खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नसिंधू महाराष्ट्र केसरी बैलगाडा स्पर्धा

देवरुख : देवरुख कांजीवरा येथे भाजपा संगमेश्वर तालुक्याच्या वतीने १० रोजी रत्न सिंधू महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकाचवेळी ५ बैलगाड्या धावणार आहेत. स्पर्धेतील प्रथम ६ क्रमांकाना अनुक्रमे ५१ हजार रुपये, ३५ हजार रुपये, २५ हजार, १५ हजार, १० हजार व ५ हजार रुपये व प्रत्येकी मनाची ढाल अशी बक्षीसे आहेत. स्पर्धेला सकाळी ११ वाजता प्रारंभ होणार आहे.

यावेळी खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे, माजी आमदार सुभाष बने, भाजपा जिल्ह्याध्यक्ष राजेश सावंत, बैलगाडा चालक मालक संघाचे जिल्ह्याध्यक्ष प्रदीप कदम, चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद अधटराव, रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्नील शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.

शहरातील मराठा भवन सभागृहात खासदार नारायण राणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा दिमाखात साजरा होणार आहे. यानंतर राणे बैलगाडा स्पर्धेच्या ठिकाणी दाखल होणार आहेत. स्पर्धेसाठी ९ रोजीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणीची मुदत आहे. अधिक माहितीसाठी अण्णा बेर्डे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी रविवारी भाजपा कार्यालयात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन स्पर्धेवावतची माहिती देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 08/Apr/2025