रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी फिजिओथेरपी महाविद्यालयात आरोग्य दिनानिमित्त गुडघेदुखीवर मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ८ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता होणार आहे.
या शिबिरादरम्यान गुडघेदुखी, सांधेदुखी, हाडदुखी अशा अनेक दुखण्यांवर, आजारांवर मार्गदर्शन आणि तपासणी करण्यात येणार आहे. डॉ. अनघा शेळके-शिंदे, डॉ. आर्या शिंदे, डॉ. करण करा, हे मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात गुडघेदुखीवर व्यक्तिगत सल्ला, तज्ज्ञांचे मार्गदर्शन पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजना सांगितल्या जाणार आहेत. रत्नागिरी आणि परिसरातील सर्व वयोगटातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका ऋतुजा हेगशेट्ये यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 08/Apr/2025














