विलास रहाटेंनी रांगोळीतून साकारले ‘रामायण’

साखरपा : देवरूख येथील युवा रांगोळीकार विलास रहाटे यांनी रामनवमीनिमित्त अनोखी रांगोळी साकारली आहे. दूरदर्शनवर गाजलेल्या रामायण मालिकेतील कलाकार रांगोळीतून साकारत त्यांनी तो काळ प्रेक्षकांसमोर उभा केला आहे.

श्रीरामाच्या भूमिकेतून अरुण गोविल आणि सीतेच्या भूमिकेतून दीपिका चिखलिया हे कलाकार घराघरांत पोहोचले होते. याच कलाकारांची आठवण देवरूख येथील रांगोळीकार विलास रहाटे यांनी रांगोळीतून करून दिली आहे. रहाटे हे सध्या पालघर येथे आहेत. तेथे पूजा ज्वेलर्स हे दुकान ४३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त त्यांनी दुकानासमोर सहा फूट बाय आठ फूट रांगोळी काढत रामायण साकारले. ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना २१ तास लागले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 08/Apr/2025