रत्नागिरी : मरिन सिंडिकेटतर्फे नौकानयन दिन साजरा

रत्नागिरी : राष्ट्रीय नौकानयत दिनानिमित्त मरिन सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित प्रदर्शनात कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शहराजवळील शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

मरिन सिंडिकेट प्रायवेट लिमिटेडचे कॅप्टन दिलीप भाटकर हे मागील ३५ वर्षे राष्ट्रीय नौकामपन दिन हा दिवस साजरा करतात. यावेळी कोकण कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, कस्टमचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा, डॉ. मंगेश शिरधनकर आदी उपस्थित होते. मत्स्य महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. केतन चौधरी यांनी समुद्र या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. मरिन सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेडमार्फत समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. प्रदर्शनात नौकानयनाशी संबंधित विविध साहित्य व उपकरणे यांची मांडणी करण्यात आली होती.

यामध्ये नौकांच्या प्रतिकृती, नौकानयन करण्यासाठी आवश्यक उपकरणे, जीवनरक्षक साधने, समुद्रामध्ये अपघातसमयी बचावासाठी वापरण्यात येणारे सिग्नल इत्यादींचा समावेश करण्यात आला.

प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना मत्स्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी श्रावणी बाणे, सुमय्या फडनाईक, ओंकार कांबळे, हंसिका म्हात्रे व चारुदत्त खडपे यांनी सर्व साहित्य उपकरणांची सविस्तर व योग्य माहिती दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 08/Apr/2025