Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray: शिवसेना उबाठा नेते आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून धक्क्यांवर धक्के बसत होते. कोकणापासून राज्यातील अनेक ठिकाणी नेते अन् कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडली.
पक्षातून केवळ आउटगोइंग सुरु होते. परंतु इनकमिंग होत नव्हते. आता कोकणातून उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारी बातमी मंगळवारी आले. काँग्रेसच्या बड्या नेत्याने कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत करत लवकरच संपूर्ण कोकण पुन्हा काबीज करणार असल्याचे सांगितले.
कोण आहेत सहदेव बेटकर?
रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील नेते सहदेव बेटकर यांनी मंगळवारी शिवबंधन बांधले. ते गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढताना त्यांनी ५२ हजार मते मिळवली होती. त्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. पराभवानंतर ते सक्रीय नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ते गुहागरमध्ये फारसे दिसले नाहीत. आता शिवसेना उबाठात येऊन ते पुन्हा सक्रीय झाले आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
सहदेव बेटकर यांचे स्वागत करत उद्धव ठाकरे म्हणाले, काही लोक शिवसेनेतून गेले मोठे झाले. पण त्यांना मोठी करणारी माणसे माझ्यासोबत आहे. शब्दाला जपणारी एकच शिवसेना आहे, दुसरी जी आहे ती गद्दार आहे. कोकणातील निकाल अनपेक्षित होता. मी परत कोकण पादाक्रांत करणार आहे. कोकणात कुणी कसा विजय मिळवला याच्या सुरस कथा समोर येतात. थापा मारणारे हात वर करून मोकळे झाले आहेत. आता पुन्हा कोकणात पक्ष मजबूत करणार आहे. तळ कोकणापासून संपूर्ण कोकण दौरा करणार आहे. पूर्ण कोकण पुन्हा काबीज करणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी संजय राऊत म्हणाले, महाभारतातील तीन पात्रे उपस्थित आहेत. उद्धवजी म्हणजे श्रीकृष्ण आहे. मी संजय आहेच आणि आता सोबत सहदेवही आहेत. नव्या कुरूक्षेत्रावरचे महायुद्ध आपण जिंकणार आहोत. त्यांना सांगितले आता मैदान बदलायचे नाही. रत्नागिरीतील ठेकेदारांचे राज्य उखडून टाका. उद्धव साहेब आपण कोकणात फक्त एक दौरा काढा. त्यानंतर संपूर्ण कोकण आपला असणार आहे.
संजय राऊत म्हणाले की, “आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक आहात.
सहदेवाच्या येण्याने नवीन कुरुक्षेत्रावर महायुद्ध सुरु झालेलं आहे. हे कोकणातलं युद्ध आपण जिंकणारच आहोत” “अनेकांनी सहदेवाना सांगितलय हे शेवटचं मैदान, आता मैदान बदलायचं नाही. आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा संपूर्ण भगवा करुन ते ठेकेदारांच राज्य संपवून टाका. मी उद्धव ठाकरेंना इतकच सांगेन कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र कोकणातील एक कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी किती कार्यकर्ते आलेत. शिवसैनिक आलेत. सगळं जागेवर आहे, बाहेर फक्त हवा आहे. बाहेरच्या हवेची दिशा बदलताना मला दिसतेय, आपण फक्त कोकणात एक दौरा करा. आपण कोकणच्या भूमीवर एक पाऊल ठेवा, पहा कशी दाणादाण उडते” असं संजय राऊत म्हणाले. ‘एक गद्दार राहणार नाही औषधाला. कोकणात खूप लढाया केल्या आहेत’ असं संजय राऊत म्हणाले. “मातोश्री माझी 92 सालापासून आहे. 92 ला मोठ्या साहेबांच दर्शन घेतलेलं. रमेश मोरेंच्या आशिर्वादाने मी मातोश्रीवर आलेलो. आज मी परत माझ्या घरात आलेलो आहे” असं सहदेव बेटकर म्हणाले. “सहदेव एवढया जोरात बोलला की, हा आवाज तळ कोकणापर्यं गेला असेल. मला आणखी काही बोलण्याची आवश्यकच वाटत नाही. दत्ता आज तुमचा वाढदिवस आहे, तुमचं खरच कौतुक आहे, स्वत:चा वाढदिवस असताना शिवसेना वाढवण्यासाठी इथे आलात. दत्तासारखे अनेक शिवसैनिक आज राज्यभर पसरले आहेत. त्यांनी आतापर्यंत शिवसेना वाढवली, शिवसेवना वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करतायत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
बघू, कोण मध्ये येतय
“संजय तुम्ही म्हणालात कोकणात एक पाऊल टाका, मी कोकणात फक्त एक पाऊल टाकणार नाही, तर संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार. बघू, कोण मध्ये येतय. लोकसभा काय, विधानसभा काय कोकणातला निकाल सर्वांना अनपेक्षित होता. कोणी, कसा विजय मिळवला त्याच्या सूरस कथा बाहेर येत आहेत. ज्यांनी थापा मारल्या ते आता हात वर करुन मोकळे झालेत. शिवसेनेची गरज राज्यातील जनतेला आहे. दिलेल्या शब्दाला जागणारा एकमेव पक्ष आहे, तो म्हणजे शिवसेना” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:09 08-04-2025














